कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : वणी उपजिल्हा रुग्णालय येथे दि.14 मे रोजी 2022 सकाळी 3 ते 4 वेळेत स्व. चुन्नीभाई मोतीभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ, वणी उप जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य नाक, कान, घसा डॉ अनिल पटेल हे रुग्णाची तपासणी करणार असून गरजू व गरीब रुग्णांना मोफत औषधं देण्यात येणार आहे तसेच शस्त्रक्रिये संदर्भात होणाऱ्या शिबिराबाबत गरजू रुग्णांना माहिती देण्यात येणार आहे. तेव्हा या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ राजकुमार राठोड, (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ संजय मडावी (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ सुतारवार मॅडम (वैद्यकीय अधीक्षक), डॉ तोडासे (पांढरकवडा वैद्यकीय अधिकारी), डॉ मयूर कडू, डॉ तृप्ती कडू, डॉ निपाणे, डॉ वानखेडे, डॉ नैताम, डॉ कांबळे, डॉ भालचंद्र आवारी (वणी वैद्यकीय अधिकारी), डॉ प्रेमचंद आवारी, डॉ नोळे, डॉ पोहे, डॉ सहारे, पांढरकवडा उप जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी वृंदानी केले आहे.
वणी येथे 14 मे ला विनामूल्य नाक कान घसा तपासणी शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 13, 2022
Rating:
