विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
अध्यक्षा किरणताई देरकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी सुषमाताई काळे, ईंदुताई किन्हेकर, डॉ.सपना केलोडे, संध्या ताई पोटे, माधुरीताई नगराळे, जीजाताई वरारकर, ऍडव्होकेट हुमेरा खान, सुरेखा ढेंगळे, वृषाली खानझोडे, कविता सोयाम, अर्चना पिदुरकर, कविता मडावी, कमल नाखवे ह्या उपस्थित होत्या.
बालिकेवर झालेल्या घृणास्पद अत्याचार हा माणुसकीला काळिमा फासणारा असून, तिला शेतशिवारात फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर येताच जवळपास शंभर प्रतिष्ठित महिलांनी अत्याचार पीडित बालिका व तिच्या कुटुंबायांची भेट घेतली. सदर खटला जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी प्रचंड आक्रमक होणार आहे असे संघटने च्या वतीने सांगण्यात आले.
नराधमाला फाशीची शिक्षा द्या - सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 13, 2022
Rating:
