वन्यप्राण्यांचे संरक्षण ही काळाची गरज..

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : दारव्हा तालुका वन्यप्राणी व पशु पक्षी ही जंगलाची शान व गौरव आहे. त्यांनाही मानवाप्रमाणे जिवन जगण्याचा अधिकार आहे. भारत देशाला आपल्या वनसंपदेवर अभिमान आहे. पशुपक्ष्यांची अनेक दुर्लभ जाती आमच्या समृध्द वनात आहेत परंतू भारतसारख्या निसर्ग उपासक देशात काही क्रुर व लालची प्रवृत्तीच्या मनुष्यांमुळे निर्जिव व मुक्या पशुपक्ष्यांची शिकार अनेक वर्षापासून सुरु असून त्यांच्या सुंदर जाती शतकाअखेर नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      रंगीबेरंगी पक्ष्यांची, पशुंची शिकार फासे पारधी व शिकारी करीत असून ते बाजारात विकायला आणतात, भाजून खातात, मुक्या पशु पक्ष्यांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. कावळे, चिमण्या, गिधाड यासारखे पक्षी दिसेनासे झाले आहेत पण हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतो. मानवविना पक्षी जिवंत राहू शकतील पण पक्ष्याविना मानवाला जगणे कडीण जाईल.

      जंगलात पाण्याविना शिकाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचे जिवन संकटात सापडले आहे. पाण्यात विष टाकून करंट लावून व बंदूकीने मुक्या प्राण्यांचे जिव देण्याची जणू शिकाऱ्यांनी शपथच घेतली आहे की काय ? वाढत्या उष्णते व आगीमुळे व वनातील प्राणी, वन्यजीव गावाकडे व शहरांकडे धाव घेतांना रस्त्यावरील दुर्घटनेत नाहक आपले जिव गमावतात. राष्ट्राच्या या अनमोल संपत्तीला आज वाचविण्याची त्यांचे , संरक्षण व संवर्धन करण्याची अत्यंत गरज आहे.
वन्यप्राण्यांचे संरक्षण ही काळाची गरज.. वन्यप्राण्यांचे संरक्षण ही काळाची गरज.. Reviewed by सह्याद्री चौफेर on May 14, 2022 Rating: 5
Powered by Blogger.