चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दुर्गम भागातसुध्दा शासनाने आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले. मात्र येथे रुग्णांची सेवा चांगल्याप्रकारे होत नसल्याने ग्रामिण भागातील नागरीक आता खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेवू लागले आहेत.
ग्रामिण भागातील सरकारी आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रीयतेमुळे खाजगी डॉक्टरांचा व्यवसाय जोमाने सुरु आहे. अनेक भागात जंगलव्याप्त व दुर्गम भाग असल्याने तसेच आदिवासी क्षेत्र काही भागात असल्याने शासनाने त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गावागावात सुदृढ आरोग्याबाबत जनजागृती आणि तपासणी मोहिम राबविण्यासाठी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली. रुग्णालयांवर सामुदायिक पालकत्व विकसित करण्याच्या उद्देशाने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मात्र याअंतर्गत देणाऱ्या रुग्णकल्याण निधीबाबत उदासिनता असल्याचे व त्याचा योग्य विनियोग होत नसल्याचे दिसते.
ग्रामिण भागातील महिला आणि मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण अद्यावत आणि परिणामकारक आरोग्यसेवा पुरेशा प्रमाणात पोहचलेली नाही.
दारव्हा तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कुचकामी...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 14, 2022
Rating:
