दारव्हा तालुक्यातील ग्रामीण भागाला विकासाची प्रतिक्षा..

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील ग्रामिण भागातील समस्या अजूनही जैसे थे असून याला स्थानिक राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामस्थांच्या मुलभुत सोयीसुविधा मिळत नसून गावाचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीकोनातून पाहिल्या जात नाही. पर्यायाने ग्रामिण भागाच्या विकासाची प्रतिक्षाच आहे.

          गावाचा विकास हा तेथील लोकप्रतिनिधीवर अवलंबून असते. मात्र अनेक गावांमध्ये रस्ते, विज, आरोग्य, पाणी, शिक्षण या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यावर भर आहे. मात्र याच समस्यांवर राजकारण करण्यात ही मंडळी धन्यता मानते. गावातील समस्या सोडविण्याची नाव ग्रामपंचायतकडे देण्यात आली आहे. गावातील समस्यांचा निपटारा करण्यासाठी शासन वेगवेगळया योजना राबवित असली तरी कमिशनपोटी कामाची गुणवत्ता चालवली आहे.

       गावपातळीवर नेतेगिरीला उधाण आले असून ही मंडळी स्वतःला धन्य समजण्यास मागेपुढे पाहत नाही. घटनादुरुस्तीमुळे ग्रामपंचायतींना भक्कम अधिकार बहाल करण्यात आले असून त्यामुळे सरपंचपदी विराजमान कोणताही व्यक्ती प्रभावशाली झाली आहे. ग्रामस्थांच्या समस्यांची त्यांना किती तळमळ आहे. गावातील स्वच्छतेच्या अनुषंगाने विचार केला तर त्यात उदासिनता दिसून येत आहे.
दारव्हा तालुक्यातील ग्रामीण भागाला विकासाची प्रतिक्षा.. दारव्हा तालुक्यातील ग्रामीण भागाला विकासाची प्रतिक्षा.. Reviewed by सह्याद्री चौफेर on May 14, 2022 Rating: 5
Powered by Blogger.