वणीतील बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला वेगाव शिवारात

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

वणी : शहरातील बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज संशसास्पद अवस्थेत मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारात आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वेगाव शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गळफास घेऊन संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकाने घटनास्थळी दाखल होवून मृतदेह मुलानी पाहिला असता दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वडिलांचा मृत्यूदेह असल्याचे दिसून आले.
वणी शहरातील सुभाषचंद्र बोस चौक येथे वास्तव्यास असलेल्या विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट (६६) याचा हा मृत्यूदेह असल्याचे पोलीस तपासात दिसून आले. ते दि.७ मे रोज शनिवारी दुपारपासून कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने शरद विजय हेपट यांनी काल वणी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. यानंतर आज हा मृतदेह वेगाव शिवारात आढळून आला.

या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलिस करत आहे.


वणीतील बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला वेगाव शिवारात वणीतील बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला वेगाव शिवारात Reviewed by सह्याद्री चौफेर on May 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.