कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : डोर्ली येथे एका ५२ वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. मृतक इसम विलास गौरकार हा स्वताच्या शेतामध्ये भुईमुंगची लागवड केली असल्याने तो शेतामध्ये जागली रविवार दि.८ मे रोजी रात्री सात वाजताच्या दरम्यान, जागलीला गेले असल्याने ते शेतातून आज सकाळी घरी परत आले नसल्याने विलास गौरकार यांचे मोठे भाऊ सतिश गौरकार यांनी शेतामध्ये गायचे दुध पाहिले असता विलास यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह शेतामध्ये आढळून आल्याने डोर्ली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विलास यांचा घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी केला असुन, या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना देण्यात आली असता माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला.