कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
जनतेची सेवा करण्यासाठी येथील विधानसभा मतदार संघातील लोकांनी काम करणारा माणूस म्हणून दुसऱ्यांदा संधी दिली आहे. शेत पांदन रस्ते, बस स्थानक, क्रीडा संकुल हे अद्याप थंड बस्त्यात आहे. सोबतच मारेगाव ग्रामीण रुग्णालयाची अवदसा झाली असतांना याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अपघातातील रुग्णांना यवतमाळ चंद्रपूर रेफर केल जात किंबहुना येथे अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत तासंतास रुग्णांना ताटकळत बसाव लागत आहे. एकीकडे "सबका साथ सबका विकास" चा नारा देणारे आमदार यावर कोणतीही भूमिका स्पष्ट घेताना दिसत नाही हेच वणी विधानसभा मतदार संघांचे दुर्दैव आहे. उपविभागात तीन रुग्णवाहीका प्रदान केली त्याचा उहापोह होत आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयात काय चालू आहे. याच यांना काहीच ठाव नाही हीच खरी शोकांतिका आहे. एकदा साहेबांनी येथील भोंगळ कारभार चहाट्यावर आणून गोरगरीब रुग्णांना द्यावा अशी सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
गेली दीड महिना वैद्यकीय अधिकारी रजेवर होते, अशात अनेक तक्रारी समोर येत होत्या, अक्खा मारेगाव प्रशासन प्रभारावर असून, रुग्णांना वाऱ्यावर सोडलं जात असतांना साहेब गप्प का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एकूणच साहेब केवळ प्रसिद्धीसाठी सगळा लवाजमा करित असल्याचे यावरून दिसून येत आहे.
अशावेळी रुग्णवाहीका देण्यापेक्षा रुग्णालयात लक्ष देणे गरजेचे आहे. यातच सामान्यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे.
साहेब रुग्णवाहीका दिली पण रेफर, अवहेलनाच काय?
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 28, 2022
Rating:
