केळापूर : तालुक्यातील ढोकी (वाई) परिसरासह (भुरकी पोड) शिवारात पट्टेदार वाघ मुक्त संचार करित असल्याचे वन विभागाच्या कॅमेरात निदर्शनास आले. त्यामुळे या परिसरातील लोकांनी जंगलाकडे जाण्याचे टाळावे. असे वन विभागाकडून सांगितले जात असून सतर्कतेचा ईशाराही देण्यात आला आहे.
सध्या मुडके (तेंदूपत्ता) गोळा करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु आहे. तर ऐकीकडे शेतीच्या कामाला सुरुवात झाली असून शेतशिवारात कास्तकारांची वर्दळ वाढली आहे. मागील दोन महिनापासून वाघाची दहशत मोठया प्रमाणात वाढली असून ढोकी (वाई) शिवारात अशोक चौधरी यांच्या शेताजवळ (ता.13 मे) रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास वाघाने दर्शन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व मुडके (तेंदूपत्ता) गोळा करणाऱ्या मजुरांना सतर्क राहण्याचा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये कमालीचे दहशत पसरली असून काम कसे? करावे कळायला मार्ग नाही.
वन विभागाने दिला सतर्कतेचा ईशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 17, 2022
Rating:
