"त्या" बालिकेच्या न्यायासाठी मारेगाव शिवसेना सरसावली

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील पहापळ येथे अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर नराधम मारोती भेंडाळे या आरोपीने लैगिक अत्याचार करून तिला काटेरी फासात फेकून दिले. या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध करण्यात आला असून विविध संघटना त्या बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी सरसवल्या असताना आता शिवसेनेच्या वतीने घटनेचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जावा या मागणीचे निवेदन मारेगाव शिवसैनिकाच्या वतीने आज मारेगाव चे ठाणेदार यांना देण्यात आले आहे.
सदर खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी शिवसेना तालुकाप्रमुख संजय आवारी, शिवसेना संघटक सुनिल गेडाम, नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की, डॉ.सपना केलोंढे, करण किंगरे, जय सिडाणा आदींसह मागणी केली. यावेळी तालुक्यातील शिवसैनिक व पहापळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"त्या" बालिकेच्या न्यायासाठी मारेगाव शिवसेना सरसावली "त्या" बालिकेच्या न्यायासाठी मारेगाव शिवसेना सरसावली Reviewed by सह्याद्री चौफेर on May 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.