सह्याद्री | चौफेर न्यूज
कोरपना : फुले, शाहु, डॉ आंबेडकर यांचे विचार प्रेरणादाई असून आदर्श समाज निर्मिती सोबत देशाच्या ऐक्यासाठी प्रेरक आहेत. त्यामुळे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या प्रत्येकाने त्यांच्या विचाराचे अनुकरण करावे,असे आवाहन जि.के. उपरे यांनी केले आहे.
कोरपना तालुक्यातील आवारपूर येथे बुध्द जयंती व सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते, यावेळी या बुद्ध जयंती व सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे हे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता जि.के.उपरे, एम.टी साव, संघा साव, कविता मडावी, यशवंत कवाडे, चेतन उदिरवाडे, किशोर सबाने, निरंजन जामगाडे, चंद्रमणी धोटे, सत्यवान दिवे, तसेच कोरपना येथील काँग्रेसचे एकमेव आशिष देरकर, अभय मुनोत, राहूल बोढे, हारून सिद्यिकी यांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाला आदींची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि विहारांच्या माध्यमातून सदैव स्मरणात राहो, त्यांनी दाखविल्या मार्गाने जाण्याची ऊर्जा प्राप्त होवो या उद्देशाने मी या क्षेत्रातील मान्यवर आमदार असल्याने विशेष मदतीला सदैव तप्तर आहे असेही आवाहन आमदार धोटे यांनी केले. आवारपूर येथील सर्व बौद्ध समाजाने गावातील तसेच परिसरातील बौद्ध कुटुंबाकडून वर्गणी गोळा करून भव्य दिव्य असे बुद्ध विहार आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. ही बाब प्रशसंनीय
असल्याचे गौरव उदगार मान्यवरांनी यावेळी बोलून दाखविले. यावेळी विविध आयोजित मंडळाच्या नेतृत्वात जि.के. उपरे, आमदार यासह आदींचा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धोटे मॅडम, सूत्रसंचालन डंभारे मॅडम यांनी केले. तर आभार केशव वानखेडे यानी मानले. पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ वानखेडे यांनी अथक परिश्नम घेतले, तर आवारपूरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यासाठी गौतम धोटे, दर्शन बदरे, रमेश खाडे, प्रमोद चांदेकर यांनी या पुतळा उभारणी करिता विशेष परिश्रम घेतले.
येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समीतिचे अध्यक्ष गौतम धोटे, दर्शन बदरे सचिव आणि आई रमाई मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून पुढील कार्यक्रमास शिला धोटे सह चेतना खाडे, लताबाई वानखेडे, धम्मबाई जिवने, शुध्दलेखा खाडे, शितल ठमके, सविता बदरे यांनी सुभाष भाऊ धोटे यांचे स्वागत केले. या निमित्ताने संध्याकाळी भोजन दान आणि महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका प्रमोदिनी साठे,वर्धा यांचा सामाजिक भीम,बुद्ध गित प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला स्थानिक परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्रपाली महिला मंडळ व आई रमाई महिला मंडळाच्या महिला तसेच सर्व बौध्द बांधवांनी या बुद्ध जयंती निमित्त सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा यशस्वी करण्यासाठी अथांग सहकार्य केले.
फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार देशाच्या ऐक्यासाठी प्रेरक -जि. के. उपरे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 17, 2022
Rating:
