नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर
वणी : पाटण (बोरी) हे केळापुर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असुन पाटण (बोरी) दुरक्षेत्रातंर्गत ४९ गावांचा संपर्क येत असतो. महाराष्ट्रराज्य व तेलंगाना सिमा लगत असुन भारतातील सर्वात मोठा श्रीनगर ते कन्याकुमारी हा राष्ट्रीय राजमार्ग लगत असल्याने अनेक अपघात ट्रक लुटमारी, तसेच अवैध्य तस्करी घटना सातत्याने घडतच असतात सर्वात महत्वाचे म्हणजे तसेच टिपेशर अभयारण्य हे महाराष्ट्रा मध्ये राष्ट्रीय राज्यमार्ग लगत असलेले हे एकमेव अभयारण्य असल्यामुळे वन्य प्राण्यांचा त्रास होत असतो.
अर्ली हे गाव पाढरकवड़ा पोलीस स्टेशन पासून ५० किलोमिटर दूर आहे. त्यामुळे लोकांना पांढरकवडा येथे जावे लागतात. त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असून या क्षेत्रा अंतर्गत सद्यस्थितीत १ जमादार व तिन शिपाई कर्मचारी कार्यरत असुन त्यांच्या जवळ कुठल्याही प्रकारचे शासकीय वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे ते तात्काळ घटनास्थळी लवकर पोहचत नाही. पाटणबोरी पोलीस स्टेशन स्वतंत्र झाले तर पांढरकवडा पोलीस प्रशासनाचा ताण कमी होईल.
विशेष बाब म्हणजे पाटणबोरी दूरक्षेत्र येथे नविन पोलिस स्टेशन निर्मिती करणे करीता मा. पोलिस महासंचालक ह्यांचे कार्यालयास प्रस्ताव क्रमांक पलि- १ नवीन पो. ठरणे पाटणारी प्रस्ताव १२६४२/२०११ दिनांक ०३.१०.२०११ अन्वये प्रस्ताव महासंचालक अमरावती मार्फत सुध्दा पाठविण्यात आला आहे. मात्र, मागिल अनेक वर्षापासुन ह्या प्रस्तावाची फाईल धुळ खात पडली आहे. तरी पाटण (बोरी) येथे तात्काळ नवीन पोलीस ठाणे देण्यासाठी विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ सह संघटक सचिन पत्रकार यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. या निमित्ताने लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष घालतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.
यावेळी पद्माकर घायवन विदर्भ प्रदेश अध्यक्ष, प्रफुल मेश्राम महाराष्ट्र संघटक, रवींद्र भाऊ चरडे, विदर्भ प्रदेश सचिव, अनिल गुंडेवार विदर्भ प्रदेश सदस्य, जर्रार खान जिल्हा उपाध्यक्ष हे उपस्थित होते.
पाटणबोरी येथे नविन पोलीस ठाण्याची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 17, 2022
Rating:
