झेरॉक्सच्या प्रतीसाठी पाच रुपये वसुली, नागरिकांची लूट..

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : दारव्हा येथील झेरॉक्स चालका कडून प्रति कॉपी ५ रुपये दर आकारणी केल्या जात आहे, त्यामुळे हे दर अवाजवी होत आहेत, परंतु या बाबीची ओरड अथवा तक्रार होत नसल्याने झेरॉक्स चालक या संधींचे सोने करून घेत नागरिकांची लूट करीत आहेत,     
          
कार्यालयीन कामासाठी विविध योजनांच्या लाभा करिता अर्ज करताना विविध कागदपत्रे जोडावे लागते त्यामुळे अनेक नागरिक या करिता मूळ कागदपत्रांची झेरॉक्स काढतात, यामध्ये त्यांना प्रति कॉपी ५ रुपये द्यावे लागत आहे.
         
या व्यतिरिक्त या झेरॉक्स केंद्रात विविध प्रकारचे कोरे प्रपत्राचे फॉर्म, दाखले, अर्जाचे नमुने यांची विक्री केल्या जात असून याचे सुद्धा दर अधिक आकारल्या जात आहे, काही ठिकाणी अनावश्यक कागदपत्रांची विक्री करून जनतेची फसवणूक केल्या जात आहे, त्यामुळे या बाबीवर कोण नियंत्रण ठेवणार असा सवाल नागरिकांतून होताना दिसत आहे.
झेरॉक्सच्या प्रतीसाठी पाच रुपये वसुली, नागरिकांची लूट.. झेरॉक्सच्या प्रतीसाठी पाच रुपये वसुली, नागरिकांची लूट.. Reviewed by सह्याद्री चौफेर on May 17, 2022 Rating: 5
Powered by Blogger.