विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड मनोहरराव गोमारे यांच्यासह मान्यवरांची सदिच्छा भेट
बालाजी सुवर्णकर | सह्याद्री चौफेर
उदगीर : नुकत्याच उदगीर येथे झालेल्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉक्टर अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड मनोहर
गोमारे,अंधश्रध्दा निर्मुलन समितिचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे,लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर,सचिव सुधीर भोसले, उदगीर येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत शिक्षक तथा ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ रावजी मुडपे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा पत्रकार धनंजय गुडसुर, श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक तथा सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे संचालक बालाजी सुवर्णकार यांनी सदिच्छा भेट देऊन उदगीर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलना विषयी चर्चा झाली. या वेळी डॉ.अंजुम कादरी (शेख) यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करुन त्यांना पुढील कार्यासाठी सर्व उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा डॉ.अंजुम कादरी (शेख) व नगरसेवक अहमद सरवर शेख यांनी सन्मान केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरसेवक अहमद सरवर यांनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद यांनी केले. तर संमनाबद्दल आभार बालाजी सुवर्णकार यांनी केले.
विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अंजुम कादरी (शेख) यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड मनोहरराव गोमारे यांच्यासह मान्यवरांची सदिच्छा भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 29, 2022
Rating:
