महिला सरपंचांनी युवकाला केली मारहाण, तक्रारीतून कारवाईची मागणी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुक्यातील कोलार (पिंप्री) येथील सरपंचांकडून गावातील युवकाला मारहाण केल्याची घटना शनिवारला दहा वाजताच्या दरम्यान घडली.

गावातील समस्या संदर्भात दीपक नरवाडे यांनी ग्रामसभेत प्रश्नांची विचारणा केली असता, या प्रश्नाचे उत्तरे नंतर देण्यात येईल असे सांगून दीपक नरवाडेंना घरी बोलावण्यात आले.
समस्ये संदर्भात माहिती घेण्यासाठी दीपक सरपंच साधना बंडू उईके यांचे घरी गेला. त्यावेळी 'मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे का देवू' असे म्हणत २५ वर्षीय दीपकला मारहाण करण्यात आली. दरम्यान, बंडू उईके वि दीपक कांबळे हे घरी पोहचले व दिपक नरवाडेला ओढतान करून, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपक नरवाडे यांनी तक्रारीतून केली आहे. 
महिला सरपंचांनी युवकाला केली मारहाण, तक्रारीतून कारवाईची मागणी  महिला सरपंचांनी युवकाला केली मारहाण, तक्रारीतून कारवाईची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.