टॉप बातम्या

शहरातील "गुरुदेव ट्रेडर्स" जळून खाक, लाखोंचे नुकसान

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शहरातील गुरू नगर येथील एका किराणा दुकानाला रात्री दोन वाजताच्या दरम्यान, भीषण आग लागल्याने किराणा दुकान जळून खाक झाले. यात लाखों रुपयाचा माल जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

गुरु नगर येथे "गुरुदेव ट्रेडर्स "या नावाने संजय माथनकर यांचे किराणा दुकान काळे हॉस्पिटलच्या जवळ आहे. त्या दुकानाला मध्यरात्री सुमारे दोन वाजता अचानक आग लागली. ह्या घटनेनकडे अनेकांनी धाव घेतली होती. फायर ब्रिगेड ला घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यासाठी फायर ब्रिगेड ला पहाटे पर्यंत यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत किराणा दुकान व गोडाऊन जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सदर आग कशामुळे लागली याबाबत अस्पष्टता असून, शहरात गेल्या दोन महिन्यातील आग लागल्याची शहरातील ही दुसरी घटना आहे. 
Previous Post Next Post