योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी जामणी : जिल्हा परिषद शाळा अहेरअल्ली येथील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटीत दररोज न चुकता संगणकावर आपले हात चालवत संगणकाचे धडे घेत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच मागे राहू नये म्हणून मुख्याध्यापक शंकर रामलू केमेकार यांनी दररोज विद्यार्थ्यांना येण्याचे आवाहन केले. तेव्हा शाळेचे सर्व विद्यार्थी न चुकता शाळेत क्लाससाठी येतात. दररोज नवनविन अभ्यास हसत खेळत अभ्यास नव्या संकल्पना नव्या अनुभवाची अनुभूती यामुळे विद्यार्थ्यांना हा उन्हाळी छंदवर्ग फार फार आवडला. व अभ्यासाला चालना मिळाली. महादीप मध्ये मिळालेल्या अपार यशामुळे शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामपंचायत समिती या छंद वर्गाला वारंवार भेटी देत आहेत व समाधान व्यक्त करित आहेत. एक नविन ज्ञान आपल्या पाल्याला मिळत असल्याने पालकामध्ये समाधानाची चर्चा आहे.
संगणक कक्ष शाळेला असावं असे स्वप्न सरपंच हितेश राऊत व शाळा व्यवस्थापन समिती यांची होती. ती आज पूर्ण होऊन विद्यार्थ्याना उपयोगी पडत असल्याने स्वतः सरपंच यांनी भेटीदरम्यान मत व्यक्त केले. संगणक साक्षरता वर्गाला गावातील उच्चशिक्षित स्वयंसेविका निकिता मन्ने ही अपार मेहनत घेत आहे. दररोज सकाळी ३ तास ती शाळेच्या या छंद वर्गासाठी देत आहे . यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अहेरअली तिचे खूप खूप कौतूक करत आहे.
या सर्व उपक्रमाचे श्रेय हे ध्येयवेडे मुख्याध्यापक केमेकार, शाळा व्यवस्थापन समिती, संगणक स्वयंसेविका मन्ने व ग्रामवासी अहेरअल्ली यांचे आहे ज्यांनी कोणत्याही नवीन उपक्रमाला प्रोत्साहन देऊन उत्साहित केले.
जिप शाळा अहेरअल्ली येथील विद्यार्थी घेत आहेत संगणकाचे धडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 18, 2022
Rating:
