टॉप बातम्या

मोहदा: गिट्टी क्रेशर मध्ये पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहदा येथे एका युवकाचा गिट्टी क्रेशर मध्ये तोल जावून  त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास साई मिनरल्स व क्रेशर दगडी खाण मध्ये घडली.

बिसनलाल चरणसिंग यादव (19) रा. पमरा ता. जुहीली जि.अनुपूर (मध्य प्रदेश) असे गिट्टी क्रेशर मध्ये अडकून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

तालुक्यातील मोहदा येथे गिट्टी खाण तसेच क्रेशर सुद्धा आहेत. येथील क्रेशर वर काम करण्यासाठी परप्रांतीय मजूर मोठया प्रमाणात कामाला आहेत. मंगळवारी रात्रीचे सुमारास गिट्टी क्रेशर सुरु असताना बिसनलाल नामक युवकाचा अचानक तोल जावून तो क्रेशर मध्ये अडकला आणि त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्डम करिता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

घटनेचा अधिक तपास शिरपूर पोलीस करित आहे.
Previous Post Next Post