कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : जुना वाद हा माणसाच्या बुद्धीला विकृतीकडे कवा कोठ कोणत्या स्तराला घेऊन जाईल याचा अंदाज, नेम नाही. एक म्हण आहे "करायला गेले काय आणि वरती झाले पाय" या म्हणी चा प्रत्यय मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथील घटनेने आलाय म्हणाले हरकत नाय.
नवरगाव येथील विलास गौरकर या शेतकऱ्याचा दि. ८ मे रोजी शेतात संशयितरित्या मृतदेह आढळून आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आत्महत्या की, घातपात अशी चर्चा तालुक्यात सुरु असताना संबंधितानी मारेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. सदर घडलेल्या घटनेतील संशयित आरोपी विशाल झाडे याला घटनेच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. परंतु सबळ पुरावे नसल्याने मुख्य आरोपी गवसत नव्हते.
तिघात ठरलं होतं....तिथे :
जुन्या वैमन्यस्यातून तिघांनी शेतकऱ्याचा बैल मारण्याचे नियोजन मारेगावातील एका बार मध्ये केले. त्यानुसार तिघे शेतातील गोठ्यात जाऊन विषारी औषधीने बैल मारण्याचे इंजेक्शन देण्याचे मनसुबे असतांना जागली गेलेल्या विलास गौरकार नामक शेतकऱ्याने आवाज दिला. आपला भांडा आता उघड होते म्हणून तिघांनी मिळून विलासचा गळा आवळून खून केला.
गेल्या सात दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचे मुख्य तीन आरोपींचा मारेगाव पोलिसांनी छडा लावून अटक केली.
अजित गैबिदास फुलझेले (३९), प्रशांत भोजराज काटकर (३४), रुपेश शंकरराव नैताम (२९) सर्व रा. नवरगाव असे जाळ्यात अडकलेल्या आरोपीचे नाव आहे.
बिअरबार मध्ये भेटगाठ करून घटनेला दिला अंजाम :
अटकेत असलेला विशाल झाडे व अजित फुलझेले यांची मारेगावच्या एका बिअरबार मध्ये भेट झाली. त्याच्या समवेत प्रशांत काटकर व रुपेश नैताम हेही हजर असतांना विशाल व फिर्यादी सतीश गौरकार यांचे जुन्या वैमनस्यातून सतिशचे गोठ्यातील बैल विषारी इंजेक्शन च्या साहाय्याने मारण्याचे ठरवले. त्यानुसार अजित, प्रशांत व रुपेश हे डोर्ली शिवारातील गोठ्यात दि.८ मे रोजी रात्री गेले. गोठा उघडताच फिर्यादीचा भाऊ विलास गौरकार हा शेजारच्या शेतात जागलीला होता. तो गोठ्याजवळ येताच त्याची आरोपीसोबत झटापट झाली. नशेत सैराट झालेल्या आरोपींनी विलासला खाली पाडले. रुपेश हा विलासच्या अंगावर बसून, अजित व प्रशांत यांनी दुपट्ट्याच्या साहाय्याने विलास गौरकार याचा गळा आवळला व यातच विलासचा मृत्यू झाला.
रविवारची पहाट आणि पोलिसांची यशस्वी कामगिरी : अवघ्या सहा दिवसात लावला घटनेचा छडा
पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अवघ्या सहा दिवसात हत्येचा उलगडा करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश पुंजलवार, ठाणेदार राजेश पुरी, उपनिरीक्षक डी. आर.सावंत यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद आलचेवार, नितीन खांदवे, रजनीकांत पाटील, विवेक राठोड, अफजल खान पठाण, अजय वाभिटकर यांनी रविवार च्या पहाटे छडा लावला.
अखेर तो खूनच, नवरगावातील तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 15, 2022
Rating:
