डोर्ली : हत्या प्रकरणी आरोपिंना चार दिवसाची कोठडी

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मारेगाव : डोर्ली येथील हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेत वास्तव उलगडले. विशाल झाडे यांचा गत पंधरा वर्षांपासून वैरी बनलेल्या सतीश गौरकार यांचे जनावरे ठार करण्याचा बेत थेट फिर्यादीचा भाऊ विलास वर उलटल्यानंतर आणखी तीन जण गजाआड झाले. चारही आरोपींना वणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना चार दिवसाची (बुधवार पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे हत्येच्या मुळापर्यंत जाऊन अनेक धागेदोरे गवसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
       
डोर्ली या छोट्याशा गावात मृत विलास व फिर्यादी सतीश गौरकार यांचे घराशेजारी हत्येत गजाआड असलेला विशाल झाडे यांचे घर आहे. जागेच्या वादावरून मागील पंधरा वर्षांपासून एकमेकात "तू तू मै मै" आहे. या ना त्याकारणाने नेहमीच भांडण होणे हा त्यांचा नित्याचा क्रम झाला होता. अशातच विशालच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना घर करू लागली. शेतात राबराब राबणाऱ्या आणि ज्यांच्या भरवशावर शेतीची मशागत आणि वर्षभर काम करवून घेतो त्या "सर्जा राजा" लाच विषारी औषधाने ठार मारणे या कुमार्गाची खिचडी डोक्यात सीजत असल्याने मारेगाव येथील बिअर बार निवडले.
दि.८ मे रोजी डोर्ली येथील विशाल झाडे सह नवरगाव येथील अजित फुलझेले, प्रशांत काटकर आणि रुपेश नैताम हे मारेगावात मद्याचे घुट घेत संध्याकाळी इंजेक्शनच्या रुपात जनावरास ठार मारण्यासाठीचा प्लॅनवर "डन" झाला. त्यानुसार रात्री उशिरा नवरगाव येथील अजित, प्रशांत, रुपेश हे तिघेही शेतातील गोठ्या जवळ पोहचले. समोरील प्लॅनिंग सक्सेस करण्याचा बेत असतांना जागली असलेला विलास गौरकार गोठ्याजवळ येताच यांच्यात झटापट झाली. यातील रुपेश याने विलासला खाली पाडून त्याच्या अंगावर बसला आणि अजित व प्रशांत यांनी दुप्पट्याने विलासचा गळा आवळून त्यास ठार केले. गोठ्याजवळ झालेली हत्या तब्बल दोनशे ते तीनशे फुटापर्यंत विलासचा मृतदेह नेऊन ठेवला. मात्र, घटनास्थळी विलासचा मोबाईल घटनेच्या सकाळी पोलीसांनी हस्तगत केला.
    
मृतकाच्या भावाने विशाल झाडे यांचे विरोधात तक्रार दाखल करताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस तपासाअंती आजतागायत १५ जणांचे बयान नोंदविण्यात आले. परिणामी विशाल झाडे यांच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सिडीआर) लोकेशन वरून शनिवारला रात्री मुख्य आरोपींचा नावावर व शोधावर पोलिसांचा शिक्कामोर्तब झाला. रविवारच्या मध्यरात्रीपासून त्यांच्या घरातून आरोपींची धरपकड झाली आणि तिघांना बेड्या ठोकल्या. 
डोर्ली : हत्या प्रकरणी आरोपिंना चार दिवसाची कोठडी डोर्ली : हत्या प्रकरणी आरोपिंना चार दिवसाची कोठडी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 15, 2022 Rating: 5
Powered by Blogger.