चेतन पवार : सह्याद्री चौफेर
यवतमाळ: लसीकरणाचे सलग सहा महिने रोजंदारीने काम केले. यासाठी निर्धारित केलेले मानधन न देता केवळ २० हजार रूपये देवून बोळवण केल्याची तक्रार डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्नील चव्हाण यांनी गुरूवार, दि. २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली. यासंदर्भात त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा आत्मदहनास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली.
दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरणाकरीता डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्नील चव्हाण, एएनएम चैताली आशिष, ललिता होलगरे, कॉम्प्युटर ऑपरेटर नीरज चव्हाण यांना रोजंदारी तत्त्वावर कार्यरत होते.कॉम्प्युटर ऑपरेटर, एएनएम यांना पाचशे रूपये प्रति दिवसदेण्याचे जमा केले. निश्चित झाले होते. तद्नंतर सलग सहा महिने कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेता त्यांनी लसीकरणाचे काम केले, परंतू उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने कुठल्याही स्वरूपाचा मोबदला त्यांना दिलाच नाही.सप्टेंबर २०२१ रोजी त्यांना निवेदनातून केला आहे. कामावरून कमी करण्यात आले. आणि वरिष्ठ कार्यालयातून पैस मिळाल्यानंतर मानधन करू, असे सांगितले. शेवटी संतप्त रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मानधन अदा करण्याबाबतचे आदेश दिले. दरम्यान, २५ नोव्हेंबर २०२१ ला त्यांच्या खात्यात २० हजार रूपये
प्रत्यक्षात मात्र महिन्याकाठी २० हजार रूपये मानधन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. केवळ २० हजार रूपये मानधन देवून प्रशासनाने बोळवण केल्याचा आरोप त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
यासंदर्भात गुरूवार, दि. २८ एप्रिल रोजी परत स्वप्नील चव्हाण अदा यांनी निवेदन दिले.
मानधन अदा करा, अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनातून केली.
थकीत मानधन त्वरित अदा करा, नाही तर आत्मदहनाची परवानगी द्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2022
Rating:
