कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
यवतमाळ : शिवसेना यवतमाळ जिल्हा व माँ आरोग्य सेवा समितीच्या संयुक्त विध्यमाने आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त शिवसेना यवतमाळ च्या वतीने वसंतराव वैधकीय महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले, ह्या कार्यक्रमासाठी नामदार संदीपान भुमरे पालकमंत्री यवतमाळ तथा माननीय आमदार संजय राठोड, जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, श्रीधर मोहाड,संजय देरकर उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती यवतमाळ, राजूदास जाधव संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश घेतला.
विनोदभाऊ ढूमणे सुपरिचित व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे मन मिळाऊ संजयभाऊ देरकर यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात सतत सोबत असणारे कट्टर समर्थक अशी ख्याती असलेले ज्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षांमध्ये वणी माजी शहर उपाध्यक्ष पदावर कार्य करीत होते,तरी आज रोजी त्याच्या प्रवेशामुळे शिवसेनेला त्याचा फायदा होणार अशी प्रतिक्रिया वणी मतदारसंघातुन ऐकावंयास मिळत आहे.
ह्यावेळी संतोष कुचनकार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वणी, प्रेमानंद धानोरकर संचालक कृ. बा. समिती वणी, डॉ.जगन जुनघरी, भगवान मोहिते, प्रवीण खानझोडे, नागेश किनाके, मनोज भट यावेळी उपस्थित होते.
विनोदभाऊ ढूमणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2022
Rating:
