एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा कार्यालयाच्या वतीने आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा

सह्याद्री | चौफेर न्यूज 

पांढरकवडा : आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, या कार्यालयाचे स्तरावर आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा 4 जून 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता नृत्य कार्य क्षेत्रातील पथकांनी दिनांक 1 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या नृत्य पथकातील कलाकारांना मानधन, येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, दैनिक भत्ता, पेहराव भत्ता, पारितोषिक इत्यादी मिळणार आहे.
या प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजामधील विविध जमातींच्या पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे संपर्क करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा कार्यालयाच्या वतीने आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा कार्यालयाच्या वतीने आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा  Reviewed by सह्याद्री चौफेर on May 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.