कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मारेगाव पुन्हा हादरलं. नुकतेच नवरगाव, मेंढणी येथील प्रकरण ताजे असतांना आज आणखीन एक किळसवानी घटना घडली आहे. एका तीस वर्षीय विवाहित नराधमाने ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तीच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी काही तासातच आरोपींला ताब्यात घेतले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत मुलीचे कुटूंब पहापळ येथे वास्तव्यास आहे. (ता. ९) मे रोजी पिडीता तिच्या आजीसोबत शौचास बाहेर गेली असता, एका इसमाने पिडित मुलीला उचलून पहापळ शेतशिवारात नेले व तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, मुलगी दिसत नसल्याने प्रथम घरच्यांनी परिसरात तिचा सर्वत्र शोध घेतला. रात्र पिंजून काढली. परंतु मुलीचा थांग पत्ता कुठेही लागला नाही. अखेर मंगळवार १० मे रोजी सकाळी पहाटे एका शेताशेजारी काट्यांच्या फासात चिमुकली आढळून आली असल्याने घरच्या मंडळीनी बालिकेला घरी आणले व तिला विश्वासात घेवून विचारपुस केली असता पिडित बालिकेने घरच्यांना आपबीतीची माहिती दिली.मंडळींनी ही आपबीती ऐकताच तळपायाची आग मस्तकात गेली व तत्काळ मारेगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी मारोती मधुकर भेंडाळे (३०) रा. पहापळ नामक आरोपीला पोलिसांनीही मोठ्या शिताफीने वडकी येथून अटक केली असुन, घटनेचा अधिक तपास विभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस तपास करित आहे.
अपहरण करून तिच्यावर केला अत्याचार; आरोपीला अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 11, 2022
Rating:
