कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : शहरालगतचे दुर्लक्षित असलेले रस्ते दुरस्ती करून शहरवासीयांना सुविधा मिळावी यासाठी दि.२४ एप्रिलला प्रभाग क्र १ व २ मधिल नागरिकांनी नगरपंचायत नगराध्यक्ष सह जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन रस्ता व पुल बनवून जाण्यासाठी सुविधा करावी अशा आशयाचे निवेदन सादर केले. मात्र, याबाबत नगरपंचायत प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्याने येत्या १२ मे पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
नगरविकास मंत्रालयामार्फत शहर विकासासाठी लाखो रुपयांचा निधी मंजुर होतो, शहरातील विकासकामे थातुरमातुर करुन शहरवासीयांची फसवणुक केल्या जात असल्याचा संतप्त सवाल शहर वासीय व्यक्त करित असुन प्रभाग १ व २ मधील नागरिकांनी शहराच्या बाहेर जाणारा अंदाजे ५०० मिटरचा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत असुन नथ्थु लाडसे यांच्या घरापासून ते बदकीदेव व डि-फार्म पर्यंत रस्ता बनवुन द्यावा यासाठी निवेदन सादर केले, परंतु नगरपंचायत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने रस्ता दुरस्ती साठी येत्या १२ मे पासुन नगरपंचायत भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे, सत्ता मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा घोडा बाजार करणारे शहर विकासासाठी नगरपंचायत सभागृहात समस्या निवारण करण्यासाठी आवाज उठवला जाणार का? असा सवाल नागरीक उपस्थित करीत असुन, उपोषणाचा इशारा संबंधित प्रशासनाने गांभीर्याने घेऊन रस्ता दुरस्तीचा निर्णय घ्यावा असी अपेक्षा मारेगाव शहरवासीय करीत आहे.
निवेदनावर राजेंद्र राजुरकर, उमेश चिंचोलकर, शेख अनवर, हरिदास चिंचोलकर, जिवन सातपुते, शेख जाबीर, सतिष मस्की, मनोहर भोयर, संतोष मस्की, झिबल जुनगरी, धनश्री काळे, संतोष राजुरकर, अतुल देवगडे सह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या निवेदनावर आहे.
रस्त्यासाठी करणार मारेगावकर उपोषण; सत्ता शहर विकासासाठी कि स्वविकासासाठी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 11, 2022
Rating:
