कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
कु.मुस्कान सय्यद हीने रासेयो मध्ये अतिशय महत्वपुर्ण योगदान दिले असून, जनजागृती अभियान, पाणी बचाव अभियान, रक्तदान, मतदान, मुलीच्या जन्माचे स्वागत करू अभियान, आपत्कालीन व्यवस्थापन यात तिने विशेष योगदान दिले असून ती TDRS मध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करतांना समाज जीवनात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेतून हजारो विद्यार्थ्याना प्रशिक्षणातून धडे देण्याचे काम केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात रूग्णाना मदतीचा हात सुद्धा मुस्काननी दिला आहे. "बेटी बचावो बेटी पढाओ" या ब्रिद वाक्याच प्रत्यक्ष उदाहरण कु.मुस्कान असून तीच्या कार्याची दखल मा.डॉ.दिलीप मालखेडे, कुलगुरू यांच्या नेतृत्वात व डॉ.राजेश बुरंगे संमन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पुरस्कार निवड समितीने घेतली असून, कु.मुस्कान सय्यद हीला राष्ट्रीय सेवा योजना चे उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे.
ती आपल्या यशाचे श्रेय मा.प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे, रा.से.यो कर्तव्यदक्ष कार्यक्रम अधिकारी व मुस्कानच्या मार्गदर्शीका डॉ.निलीमा दवणे तसेच प्रा. किशन घोगरे आणि आपल्या आई वडीलांना देते.
मुस्कानला उत्कृष्ठ स्वयंसेविका पुरस्कार जाहीर झालाबद्दल तिचे सर्वस्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुस्कान सय्यद ठरली विद्यापीठ उत्कृष्ठ रासेयो स्वयंसेवक पुरस्काराची मानकरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 28, 2022
Rating:
