सह्याद्री | चौफेर न्यूज
मारेगाव : मागील आठवड्यात मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील सहा वर्षीय चिमुकली वर झालेल्या अत्याचाराविरुध् मारेगाव येथील ठाणेदार याची भेट घेऊन आरोपी वर कडक करण्यात यावी म्हणून 'सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन' च्या वतीने शेकडो महिलांच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण जलदगतीने चालवावे म्हणून आज परत पहापळ येथे जावून पीडित कुटूंबाची भेट घेऊन त्याची विचारपूस करण्यात आली.
आपल्या मुलीला न्याय जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत पुढील न्यायालयीन कामात आम्ही सर्व महिला आपल्या कुटूंबासोबत आहोत,असे सन्मान स्त्री फाउंडेशन च्या सांगण्यात आले. तसेच वेळ प्रसंगी चिमूरडी ला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलन सुद्धा उभारण्यात येणार असल्याचे ह्यावेळी फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, गावातील शेकडो महिलां या भेटी दरम्यान उपस्थित होत्या.
फाउंडेशन च्या सर्वेसर्वा किरणताई देरकर, यांच्या सह वृषालीताई खानझोडे, सुरेखाताई ढेंगळे, दिशा फुलझेले, जयश्री पवार, दीपाली गुरुनुले, सोबत अनिलभाउ आवारी, राजूभाऊ मोहितकार हे उपस्थित होते.
पहापळ येथील घटनेची दखल घेत न्यायालयीन कामात सहकार्य करणार - किरणताई देरकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 16, 2022
Rating:
