टॉप बातम्या

वृद्ध इसमाचा आढळला मृतदेह

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवाळा शिवारात एका वृद्धाचा मृतदेह आज दि.17 मे रोज मंगळवारला सकाळी आढळून आल्याने वेगवेगळ्या तर्कवितर्काला परिसरात उधाण आले आहे.
  
रामचंद्र लटारी निखाडे (75) असे शिवारात मृतदेह आढळलेल्या वृद्धांचे नाव आहे. मृतकाचा मुलगा अंकुश निखाडे याने सोमवारला वडील बेपत्ता असल्याची मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. तत्पूर्वी नातेवाईक यांचे कडे वडीलाबाबत शहानिशा करण्यात आली मात्र, त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.
आज सकाळी रामचंद्र निखाडे यांचा मृतदेहच देवाळा शिवारात आढळला. दरम्यान, मृतक हा बकऱ्या चारण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. वृद्धाचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत अजून स्पष्टता नाही. 
Previous Post Next Post