कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतीच्याहद्दी मध्ये होणाऱ्या गौण खनिजापासून साधारण ४०० कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला (रॉयल्टी) स्वामित्व धन च्या माध्यमातून प्राप्त झाले.मात्र,प्रत्यक्ष मोहदा गावासाठी कसल्याही प्रकारचा विकासनिधी मिळालेला नाही. हे माहितीच्या अधिकारातील माहिती प्राप्त झाली. अथक परिश्रम करून अखेर मार्ग अवलंबवावा लागला असून हा मोहदा वासिय जनतेवर अन्याय आहे. असा आरोप रासेकर यांनी केला आहे. गावावर ही पाळी येत असेल तर पोळ, तांडे यांची काय अवस्था असेल असेही त्यांनी म्हटलं. या ४०० कोटी रुपयातून हक्काचे १० टक्के रक्कम म्हणजे ४० कोटी रुपये मोहदा गावाच्या विकासासाठी देण्यात यावे व हा निधी मंजूर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा कामगार व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मा संदीपान भुमरे पालकमंत्री यांना निवेदनातून देण्यात आल्या नंतर पालकमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेत मोहदा सरपंच वर्षां राजूरकर, उपसरपंच सचिन रासेकर, सदस्य गजानन शेलावडे व गणेश बोन्डे यांच्याशी चर्चा करून निधी मंजूर करा असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आदेश दिले.
मात्र,पालकमंत्र्यांच्या आदेशाचे जिल्हाधिकारी यांनी पालन करून आम्हा न्याय द्यावा अशी सरपंच, उप सरपंच, सदस्यांसह व मोहदा ग्राम वासियांना प्रतीक्षा लागली आहे.
सरपंच, उपसरपंच व सदस्य गाव विकासासाठी अग्रेसीत... मात्र
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 05, 2022
Rating:
