बाबासाहेबांची जयंती म्हणजे शोषितांच्या मुक्तिचा उत्सव आहे - गीत घोष


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : स्वातंत्र्यपुर्व काळात भारतीय दलित, आदिवासी, बहुजन सर्वहारा समाज सामाजिक, आर्थिक,शैक्षिक, राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या येथिल पुरोहितशाहीचा गुलाम होता,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहून या समाजाच्या पायात पडलेल्या गुलामीच्या बेड्या तोडून त्यांना या गुलामीतून मुक्त करून स्वतंत्र केले, त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे शोषितांच्या मुक्तिचा उत्सव आहे आणि हा उत्सव सर्वांनी साजरा करावा असे उदगार प्रगतिशील साहित्यिक व विचारवंत गीत घोष यांनी प्रमुख वक्ता म्हणून बोलतांना काढले. ते नांदेपेरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य आयोजीत व्याख्यानाचे मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.
          
नांदेपेरा येथिल भरतीय बौध्द महासभा व रमाबाई महिला मंडळ नांदेपरा व पोहणा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंती समारोहाचे अध्यक्ष मा. शंकरराव शेंडे हे होते, प्रमुख मार्गदर्शक मा.गीत घोष, राजेंद्र खोब्रागडे सर,श्रावण थुल सर,हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वणी पं.सं.च्या माजी उपसभापती मा.सौ.चंद्रज्योती शेंडे, ग्रा.पं.चे सरपंच मा.श्री.विलासभाऊ चिकटे, खुशालभाऊ रामटेके, प्रभाकर सावे, संभाजी वनकर, चंद्रकांता धोपटे, प्रफुल शेंडे, प्रविण खैरे हे होते.

यापुढे बोलतांना घोष म्हणाले की, आता पुन्हा आपल्या देशाची परिस्थती अत्यंत बिकट होतांना दिसत आहे, देशातील सर्व लोकांना भारतीय राज्यघटनेने बहाल केलेली हक्क व अधिकार पुन्हा एकदा हिसकाऊन घेतले जातील की काय असे वातावरण राज्यकर्त्या वर्गाकडून निर्माण केले जात आहे, यासाठी देशातील सर्व लोकांनी सजग होऊन या परिस्थितीचा मुकाबला संघटीतपणे करण्याशिवाय तरणोपाय नाही,असेही त्यांनी सुचवले.
या कार्यक्रमाचे संचालन, संदिप शेंडे यांनी, प्रास्ताविक संतोषभाऊ रामटेके यांनी केले तर,आभार सुरेशभाऊ यांनी मानले. या नंतर सायंकाळी ६ वाजता गांवातून मोठ्या उत्सहात मिरवणूक काढण्यात आली. रात्री भोजन दानानंतर कार्यक्रम संपला.

हा जयंती कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आयु. रविंद्र वनकर, विजय शेंडे, संगीता रामटेके, सुजाता शेंडे, रेखाबाई आरवंट, चंद्रमा वानखेडे, प्रज्ञा मजगवळी, ईशिका भालेराव, क्रांती शेंडे, सिध्दांती रामटेके, संघर्ष शेंडे, यश वानखेडे, प्रसन्नजीत शेन्डे, गणपत पाटील, मोहनजी थुल, दिपक वानखेडे, यादव वानखेडे, दिक्षा ढेंगळे,लिनाताई ढेंगळे, अनीताताई मजगवळी, अर्चना शेन्डे, ज्योती मजगवळी, संतोष शेन्डे, अनिल डोंगे, अमोल वनकर, नामदेव वनकर, प्रशांत वनकर, विश्वास ढेंगळे यांनी परिश्रम घेतले.
बाबासाहेबांची जयंती म्हणजे शोषितांच्या मुक्तिचा उत्सव आहे - गीत घोष बाबासाहेबांची जयंती म्हणजे शोषितांच्या मुक्तिचा उत्सव आहे - गीत घोष Reviewed by सह्याद्री चौफेर on April 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.