टॉप बातम्या

आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने महिलेचे प्राण वाचले

सह्याद्री चौफेर | न्यूज

वणी : काल शनिवारी दुपार च्या सुमारास येथील गाडगेबाबा चौकातील एक महिला घराचे दार बंद करून आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचा दूरध्वनी वणी पोलिसांना आला.

पोलिसांनी लगेच गाडगेबाबा चौकाकडे धाव घेतली. त्यावेळी संबंधित महिला घराच्या आतील आड्याला दोरी बांधून फाशी घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेचच कुऱ्हाडीद्वारे घराचे दार तोडून आत प्रवेश करून महिलांच्या मदतीने तिला खाली उतरवले व ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार केल्यानंतर तिला तपासणीसाठी चंद्रपूर हलविले.
    (जाहिरातीसाठी संपर्क - 7218187198)
Previous Post Next Post