रवि घुमे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : दिवसेंदिवस ह्या वाढत्या महागाई मुळे सर्व सामान्याचे बजेट कोलमडले असून या दरवाढीने सामान्य जनताच काय तर भले भले ही वैतागले आहे.
मारेगाव येथे वाढत्या महागाई विरोधात भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात जाहीर निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
आज रोजी जीवनाश्यक वस्तू सह पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे देशातील शेतकरी शेतमजूरांचे जगणे कठीण झाले आहे. या केंद्र सरकार ला जनतेचे काही देणे घेणे नसून जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं जात आहे. केंद्रातील मोदी सरकार ची वाढती महागाई जनतेचे कंबरडे मोडणारी आहे. या वरून असंच दिसतं आहे की, नेते तुपाशी आणि जनता उपाशी, त्यामुळे मारेगाव तालुका कम्युनिष्ट पक्ष केंद्र सरकार च्या वाढत्या महागाई चा जाहीरपणे निषेध करते. सरकारने जीवनाश्यक वस्तू सह पेट्रोल,डिझेलचे, गॅस चे दर कमी करून सामान्य जनतेची लूट थांबवावी व भांडवलशाहीचे हित न जोपासता गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांच्या हिताचेच पाऊल उचलून सहकार्य करावे अशी मागणी निवेदनातून प्रधानमंत्र्यांना करण्यात आली आहे.
पक्षाचे तालुका सचिव बंडू गोलर, सहसचिव सतीश श्रीकांत तांबेकर यांच्या नेतृत्वात मार्डी चौक येथे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून सभा घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महागाई विरोधात मारेगावात कम्युनिष्ट पक्षाचे जाहीर निदर्शने व आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 09, 2022
Rating:
