टॉप बातम्या

शंकरराव डोहणे यांचे निधन

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : नरसाळा येथे वास्तव्यात असलेले शंकरराव उरकुडाजी डोहणे यांचे आज रविवारला अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० होते.

मारेगाव येथील मूळ गाव असलेले शंकरराव यांनी ऐन तारुण्यात नरसाळा येथील मेटल्स कारखान्यात नौकरी मिळविली आणि नरसाळा येथे स्थायिक झाले. पती ,पत्नी एक मुलगी असा संसाराचा गाडा हाकत असतांना सहा वर्षांपूर्वी एकुलत्या एक विवाहीत कन्येचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून कौटुंबिक मन कमालीचे विचलित होते.

दरम्यान शंकरराव हे चालते बोलते असतांना शनिवारला शरीरात हलक्याशा वेदना होत असल्याने स्वतःहून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.काहीशी प्रकृतीत सुधारणा होत होती. आज रविवारला सकाळी पुन्हा प्रकृतीत बिघाड झाला. जिल्हास्थळी हलविण्याचा प्रयत्न सुरू असतांना सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते मारेगाव येथील पत्रकार दीपक डोहणे व यवतमाळ येथील मिलिंद डोहणे यांचे काका होते. शंकरराव डोहणे यांच्या पश्चात पत्नी शांताबाई आहे.

आज रविवार ला सायंकाळी पाच वाजता नरसाळा येथील स्मशानभूमीत शंकरराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.
Previous Post Next Post