अधिक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात


सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : येथील बहुचर्चित उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक व लिपिक यांना शेतमोजणीचे १५ हजार रुपयांची लाच घेतांना अमरावती येथील लाच लूचपत विभागाने आज मंगळवारला रंगेहात पकडून अटक केली. या घटनेने प्रशासनात पुरती खळबळ उडाली आहे.
     
मारेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यांकडून शेत मोजणी करण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडी अंती १५ हजार रुपयांत अंतिम रूप देण्यात आले. यात आज दिनांक ५ एप्रिल रोजी ५ हजार रुपयांची लाच घेतांना अधिक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली.
    

सदर कारवाई अमरावती लाच लूचपत विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, संजय महाजन यांचे मार्गदर्शनात पो.नि.संतोष इंगळे, युवराज राठोड, निलेश महिंगे, सतीश किटूकले यांनी पार पाडली.
    
दरम्यान, आर्थिक देवाण घेवाण करण्यात विशिष्ठ बहूचर्चेत असलेल्या या कारवाईने सर्वत्र लाभार्थ्यांत समाधान व्यक्त केल्या जात आहे.


-
अधिक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अधिक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on April 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.