महाराष्ट्र ट्राईबल आघाडीची कार्यकर्ता बैठक

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : महाराष्ट्र ट्राईबल आघाडीच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या सामाजिक, राजकिय, आर्थिक व शैक्षणिक इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र ट्राईबल आघाडीच्या वतीने सांगण्यात येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी राजकिय अस्तित्वाबद्दल आपली रणनिती आखणार आहे. वणी तालुका, वणी शहर, मारेगाव तालुका, झरी तालुका आणि सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाअधिकाऱ्यांनी ह्या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. 

रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी 
दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत शेतकरी मंदिर सभागृह, वणी जिल्हा यवतमाळ येथे सर्व आदिवासी बांंधवांनी उपस्थित राहून आपले परिवर्तनवादी विचार बैठकीमध्ये व्यक्त करून महाराष्ट्र ट्राईबल आघाडीला सहकार्य करावे असे  संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड.संतोष भादिकर, यांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्र ट्राईबल आघाडीची कार्यकर्ता बैठक महाराष्ट्र ट्राईबल आघाडीची कार्यकर्ता बैठक Reviewed by सह्याद्री चौफेर on April 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.