सह्याद्री चौफेर | न्यूज
यवतमाळ : जिल्ह्यात उन्हाचा पारा कायम आहे. काल ४२.५ अंशावर तापमान पोहचले. सकाळी ७ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहे. वाढत्या उन्हाने शेतशिवारातील कामावरही परिणाम झाला आहे.
डोक्यावर सूर्य येईपर्यंत शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर आता ९ वाजताच घराकडे वापस येत आहे.
उन्हामुळे जनजीवन प्रभावित केले आहे. बांधकामावर असलेल्या मजुरांनाही आता आपल्या कामाच्या वेळा बदलाव्या लागत आहे. इतर क्षेत्रात श्रमाचे काम करणारी मंडळी ऊन्हाचे नियोजन करून आपली रोजीरोटी कशी सुरु ठेवता येईल, याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. दुसरीकडे उष्माघात झाल्याचे रुग्ण आढळत आहेत. घराच्या बाहेर पडताना खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात उन्हाचा पारा, तापमान ४२.५ अंशावर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 05, 2022
Rating:
