आईच्या नावाच्या आधारावर जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र शासनाने देण्याची तरतूद करावी -भारतीय नारी रक्षा संघटनेची मागणी


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : जी जात नाही ती जात, असं जातीबद्दल बोललं जातं. अपत्याला जन्मजात वडिलांची जात मिळते मात्र यवतमाळमध्ये एका मुलीला तिच्या आईची जात लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
घटस्फोटित महिलेच्या अपत्याला मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. संबंधीत मुलीच्या आईने दिलेली कागदपत्रे तिच्या वडिलांची नसून तिच्या आईची आहेत या कारणावरून उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांनी जात प्रमाणपत्र देण्याची याचिकाकत्याने केलेली विनंती मान्य करण्यात आली नव्हती यामुळे घटस्फोटीत महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे याचिकाकर्त्याने तिच्या आईच्या कागदपत्रांच्या आधारे याचिकाकर्त्याला जातीचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश प्राधिकरणाला द्यावेत अशी विनंती करत या न्यायालयात धाव घेतली आहे. अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र छाननी समिती, अमरावती आणि आणखी एक मध्ये तशाच प्रकारचा मुद्दा विचारात घेतल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की आईच्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी असेल. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निर्णय नुकताच घेतला आहे.


आईच्या नावाच्या आधारे त्यांच्या अपत्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र द्या !

पतीपासून विभक्त व घटस्फोटीत महिलांना अपत्याच्या जात प्रमाणपत्रासाठी अडचणीचा सामना करावा लागतो.
जातीचे प्रमाणपत्र आईच्या नावाने मिळण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागते. यामुळे महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून या निर्णयाच्या आधारे महाराष्ट्र शासनाने व सामाजीक न्याय विभागाने परिपत्रक काढून आईच्या नावाच्या आधारे त्यांच्या अपत्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची तरतुद करावी. 
यामुळे कुमारी माता, घटस्फोटित परित्याक्त्या, लिव्ह इन-रिलेशनशिपनंतर विभक्त झालेल्या आणि प्रेम प्रकरणातून झालेल्या अपत्यांना मोठा दिलासा मिळेल.

-सुकांत प्रकाश वंजारी 
सचिव भारतीय नारी रक्षा संघटना
आईच्या नावाच्या आधारावर जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र शासनाने देण्याची तरतूद करावी -भारतीय नारी रक्षा संघटनेची मागणी आईच्या नावाच्या आधारावर जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र शासनाने देण्याची तरतूद करावी -भारतीय नारी रक्षा संघटनेची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on April 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.