सेवावर्ती समाजसेवक शेषराव इंगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्य सत्कार


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : म.राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले श्री शेषराव इंगळे यांचा सपत्नीक सत्कार ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकरराव उईके यांचे हस्ते जिजाऊ भवन पुसद रोड, उमरखेड येथे करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय अध्यक्ष प्रा. उईके म्हणाले की, आपण कर्मचारी म्हणून सेवा देत असताना त्या सोबतच समाज सेवा देखील केले पाहिजे. आपण शिकलो सुशिक्षित झालो नोकरीला लागलो. परंतु आपला समाज बांधव आज देखील गाव खेड्यात मार्गदर्शना अभावी आपल्या हक्का पासून वंचित राहतो आहे. त्यांचे साठी देखील आपण वेळ काढून त्यांना मार्गदर्शन करावे. म्हणजे आपण आपल्या समाजासाठी काही अंशी कामी आलो व समाज ऋण फेडल्यासारखे होईल. त्या अनुषंगाने आपल्या समाजाची प्रगती होईल आणि हेच सेवाभावी वृतीने शेषराव इंगळे समाज सेवेचे कार्य करीत आहेत.

शेषराव इंगळे हे सेवेत असताना आपली जाबदारी सांभाळून आदिवासी ग्रामीण भागात सामूहिक विवाह मेळावे, रक्तदान शिबीर, महिलां मेळावा, सांस्कृतिक व समाज प्रबोधन मेळावे आणी सर्व आदिवासी कर्मचाऱ्यांचं संघटन करण्याचे कामे करीत आले आहेत. आजच्या प्रसंगी जमलेली असंख्य स्नेही मंडळी त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांनी समाजकार्य, सत्कार्य केले म्हूणन आपण त्यांचा सत्कार करित आहोत.
या प्रसंगी बिरसाक्रांती दलाचे राज्यध्यक्ष रंगराव काळे, ऑ. ई. आदी. एम्प. फेड. केंद्रीय कार्यअध्यक्ष सुरेश कनाके, राज्य उपाध्यक्ष गुलाबराव कुळमेथे, केंद्रीय सदस्य पवनकुमार आतराम,यांनी आपले विचार व्यक्त केले.

या वेळी प्रल्हाद सिडाम, शंकर कोटनाके,नारायण कराळे, दतराव ब्राह्मटेके, शंकरराव नाटकर, किशोर उईके,विजय गेडाम, अभिमन्यू धुर्वे, प्रा.गजानन कोवे, डी. बी. अंबोरे दत्ता उगले, के. पी. पांडे,आर. डी. तोडकर, व ऑ. ई. आदी. एम्प. फेडरेशन व बिरसाक्रांती दल, एस. टी. महामंडळाचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. 


सेवावर्ती समाजसेवक शेषराव इंगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्य सत्कार सेवावर्ती समाजसेवक शेषराव इंगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्य सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on April 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.