रवि घुमे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : रमजानचा महिना सुरू होताच, ९ वर्षांच्या चिमुकल्या मिसबाह शरीफने रमजान चा पहिला रोजा ठेवला. जिथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे, अशा परिस्थितीत स्पोर्ट्स आईस्क्रीमचा आग्रह धरण्याचे वय असताना मिसबाह ने सारे खेळ बाजूला सारून रोजा करीत आहे.
इस्लाम धर्मातील सर्वोच्च आणि उपासनेचा महिना मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात मिसबाह शरीफ यांनी पालकांचा आग्रह धरून पहिला उपवास ठेवला आहे. मुस्लीम धर्मातील लहान मुले समाज, तरूण वडिलधारी मंडळीही उपवास आणि नमाज पठण केल्या नंतर अल्लाह च्या पूजनात मग्न आहेत. सूर्य आग ओकत आहे अशा कडक सूर्यप्रकाशात रोजा करणे म्हणजे अल्लाह च्या दयेच्या सावलीत असणारे लोक.
मुस्लिम समाजाच्या १२ महिन्यांपैकी अफजल आणि उपासनेचा महिना रमजान चा महिना मानला जातो, या महिन्यात रमजानचे ३० दिवस उपवास ठेवले जातात, उपवास पाळणे म्हणजे पूर्णपणे उपाशी असणे, अगदी पाणी पिण्यासही सक्त मनाई आहे. कडक उन्हात रोज चा उपवास पूर्णतः अल्लाह च्या उपासनेत गुंतलेला असतो, कडक उन्हात, रोजंदारी करणार्यांवर सूर्याचा कोणताही परिणाम होत नाही. तीस दिवस तारवीहीची नमाजही अदा केली जाते, ही नमाज पूर्ण १ तासाची असते, जे मशिदीचे इमाम कुराण शरीफचे एक ते दोन पारे पाठ करतात आणि तारवाहीच्या नमाजमध्ये वाचतात.
कडाक्याच्या उन्हात ९ वर्षांच्या चिमुकल्या मिसबाहने ठेवला रमजानचा रोजा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 04, 2022
Rating:
