कोट्यावधी निधी शासनाला देणारा मोहदा गाव विकासापासून वंचित: सचिन रासेकर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : यवतमाळ जिल्हातील तालुका वणी अंतर्गत मौजा मोहदा गाव नावे गौणखनिज शासनाला कोट्याधीश रुपये प्राप्त होतं असताना, 30 वर्षांपासून गाव मात्र स्वामीत्व धनाच्यानिधीपासू आजही वंचित असल्याचे माहिती अधिकाराच्या माहिती वरून समोर आले आहे. ही उदासीनता कोणाची? असा प्रश्न माहिती अधिकार कर्ते सचिन रासेकर यांनी उपस्थित केला आहे.

वणी तालुक्यातील मोहदा हे गाव गौणखनिज साठी प्रसिद्ध असून,वणी उद्योगिक विकास महामंडळ यांच्या कडून स्वामीत्व धन प्राप्त होणाऱ्या धना पेक्षा मोहदा हे एक मात्र गाव मागील तीस वर्षा पासून शासनाला 400 कोटी स्वामीत्व धन देणारे गाव ठरले असून, देणाऱ्यानी देतच राहावे, घेणाऱ्यानी घेतच राहावे हे धोरण शासना प्रती राहिल्याने मोहदा गावाचा विकास हा वाजोटा ठरला असून तो का झाला नाही? झाला तर शासन खर्च किती हा प्रश्न माहिती अधिकार निर्माण कर्ते सचिनला यांना भेडसावला असल्याने दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाअधिकारी खनिकर्म विभाग यांना खनिज विकास निधी अंतर्गत झालेली कामे या बाबत माहितीचा तपशील मागितला असता जन माहिती अधिकारी यांचा अभिप्रायात सन 2016 ते 2021 या कालावधीत खनिज विकास निधी मधून कामे मंजूर झाल्याचे दिसून येत नाही अशी पुष्टी देऊन, शासन कामा प्रति व जनते प्रति जनसेवक कर्तृत्वाचे काम हे निष्टेने पूर्ण करत नसल्याचे चित्र समोर येत असून शासनाच्या तिजोरीत नजाराणा स्वरूपात स्वामीत्व धन प्राप्त होत असताना गावाच्या वाट्याला फक्त खड्डे व पिण्यास दूषित पाणी, प्रदूषण हेच वाट्याला काय?असा संतप्त प्रश्न माहितीधिकार करत्याकडून उपस्थितीत केला असून उत्पन्न प्राप्त गाव विकासा पासून वंचित राहत असेल तर, तांडा वस्ती, पोड वस्ती, यांचा विकास खरंच झालं असतील काय हे माहिती अधिकारावरून समोर येत असून शासन दप्तरी, कामाची दिरंगाई खरंच विकासाच्या दिशेने घेऊन जातील काय हा प्रश्न सचिन रासेकर यांना दिलेल्या माहिती वरून समोर येत असून स्वामित्व धन आकडा लक्षात घेता गौणखनीज गाव निधीच्या थकीत 40 कोटीच्या निधीला दिशा येणार तर केव्हा? अस्या थकीत देयकाच्या विकास निधी वरून प्रश्न सचिन रासेकर यानी केला आहे.
कोट्यावधी निधी शासनाला देणारा मोहदा गाव विकासापासून वंचित: सचिन रासेकर कोट्यावधी निधी शासनाला देणारा मोहदा गाव विकासापासून वंचित: सचिन रासेकर Reviewed by सह्याद्री चौफेर on April 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.