मारेगाव महाविद्दालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महविद्दालय, येथे, दि. 22 एप्रिल 2022 रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे विज्ञान प्रद्रशनीचे आयोजन केले होते. या प्रदर्शनीत बी. एस. सी. भाग 3 च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी टाकावू वस्तू पासून विशिष्ठ प्रकारचे मॉडेल बनवून प्रकल्प सादर केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. जिवन पाटील कापसे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, कनिष्ठ महविद्यालयाचे प्राचार्य श्री. हेमंत चौधरी व प्रा.‌ डॉ. पवार उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी तर प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कापसे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून सादर केलेल्या प्रकल्पाला भविष्यामध्ये प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. कुळकर्णी, डॉ. चिरडे, डॉ. राऊत, प्रा. कांबळे, प्रा. जेणेकर, प्रा. आत्राम, प्रा. वांढरे व श्री. आकाश कुमरे इत्यादी मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अड्सरे यांनी परिश्रम घेतले.
मारेगाव महाविद्दालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा मारेगाव महाविद्दालयात जागतिक वसुंधरा दिन साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on April 23, 2022 Rating: 5
Powered by Blogger.