योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी जामणी : जिल्हा परिषद शाळा गवारा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय करमरगूलवार व प्रमुख अतिथी म्हणून गवारा गावचे उपसरपंच प्रविण नामदेव गुरनुले, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका एलकिवार मॅडम हे होत्या. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषणे केली.
यात कु. सृतिका अशोक मोरेवार ईयत्ता ६ वी, कु.अश्वीना गजानन न्याहारे, इयत्ता ६ वी, कु.जान्हवी मधूकर आकूलवार इयत्ता ६ वी, कु. ऋतुजा विनोद चाहारे, कु.सानिका दामोधर गुरनुले इयत्ता ७ वी, कु.धनश्री न्याहारे इयत्ता ७वी, सलोनी फसलवार ७ वी, रीमा भोयर, धनश्री गुरनुले, आर्यन करमरगूलवार आदि विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषणे केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मदिकुंटावार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवलवार सर्व मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषणे केली. या कार्यक्रमाची सांगता प्रविण नामदेव गुरनुले यांच्या सुरेल आवाजातील भिमगीताने झाली व आभार प्रदर्शन नैताम सर यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा गवारा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 14, 2022
Rating:
