श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उत्साहात जयंती साजरी


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : मराठा शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत चालणाऱ्या उदगीर येथील श्री विश्वनाथराव चालवा प्राथमिक विद्यालयात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील हिंदी विषयाची विभागप्रमुख कालिदास सोमवंशी होते. प्रमुख पाहुणे कालिदास सोमवंशी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी जयंतीनिमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

या जयंती कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक बालाजी सुवर्णकार, शिवाजी दाडगे, माधव गुळे, नागनाथ सोमवंशी, दीपक आलट, उषा बोळेगाव, अनुसया मोरे, प्रकाश भंडारे शिक्षकेतर कर्मचारी सुनील बिरादार इत्यादिंची उपस्थिती होते .