कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
कोरोना मुळे गेल्या दोन वर्षात थोर महापुरुषांचे उत्सव सोहळे ठप्प होते. परंतु या वर्षी लाट ओसरताच शासनाने निर्बंध हटवून सण उत्सव सोहळे करण्यास पवानगी दिल्याने देशभऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा एप्रिल महिना विविध सण उत्सव सोहळ्या ने नटून थटून बहरून आला आहे. या महिन्यात गुढी पाडवा, रमजान, रामनवमी, महात्मा फुले जयंती, महावीर जयंती, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया हर्षा उल्हासाने व शांततेत काल शहरात पार पडली. रात्री या जयंतीनिमित्ताने रॅली चे आयोजन करण्यात आले होते, त्यात सर्व आंबेडकरी अनुयायी व महामानवाला छत्रपती शिवाजी महाराज,फुले,छत्रपती शाहू महाराज यांना मानणारा वर्ग यात मोठया संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी शहरात एकत्र जमला होता. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या अनुयायांना शरबत, मसाला भात याची व्यवस्थाही करण्यात आली.
आज देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज आहे. शिका, संघठीत व्हा, संघर्ष करा हा संदेश अंगिकारण्याची प्रेरणा प्रत्येक व्यक्ती मध्ये निर्माण व्हावी. असे मत पत्रकार घुमे यांनी व्यक्त केले.
तसेच गुड फ्रायडे, हनुमान जयंती, ईस्टर डे हे सुद्धा उत्सव मोठया उत्साहात व शांततेत पार पडतील यात शंका नाही असे मत उपस्थितांनी व्यक्त केली.
शहरात जयंती उत्सहात व शांततेत साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 15, 2022
Rating:
