मुख्यकार्यकारी अधिकारी मा. श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांची जि. प.कात्री शाळेला भेट

रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प.यवतमाळ यांनी नुकताच जि. प.उच्च प्राथमिक शाळा कात्री प. स.कळंब येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले.विद्यार्थांच्या प्रगतीचा त्यांना प्रश्न विचारून आढावा घेतला. याप्रसंगी बहुचर्चित असलेली महादीप ही जणू लहान मुलांची Mpsc,Upsc परीक्षा! महादीप 2022 या जिल्हा परिषद यवतमाळ कडून घेतल्या गेलेल्या परीक्षेत कात्री शाळेचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यामध्ये इयत्ता 7 वी तील ओंकार आनंद बंसोड, कु.वैष्णवी अशोक वालदे, कु.सायली मारोती डंभारे व वर्ग 6वी तील निशांत डूबे या चार विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या. महादीप या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद यवतमाळ कडून खूप मोठी भेट मिळणार आहे. ती म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना विमानात बसून दिल्ली किंवा बंगलोर दर्शन करायला मिळेल. तेथील प्रेक्षणिय स्थळे पाहायला मिळेल. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब व मा.शिक्षणाधिकारी श्री.प्रमोद सुर्यवंशी साहेब यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाचन करायला लावले व विद्यार्थ्यांनी अचूक वाचन केल्यामुळे समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शालेय परिसर पाहण्यात आला. साहेबांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी उपमुख्यकार्यकारी अधिकारी मा.अरविंद गुडदे साहेब, मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.प्रमोद सूर्यवंशी साहेब, मा.गटविकास अधिकारी श्री.सुभाष मानकर 
साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री.राजू मडावी साहेब, गटशिक्षणाधिकारी कळंब मा.गणेश मैघणे साहेब, विस्तार अधिकारी शिक्षण मा.श्री.अमोल वरसे साहेब, केंद्रप्रमुख मा.जयवंत दुबे सर, केंद्रप्रमुख कात्री मा.कल्पना हजारे मॅडम, उपसरपंच कात्री मा.शेख जमील शेख गुलाब, कात्री शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजली पजगाडे,शिक्षकवृंद श्री.अतुल खासरे, कु.आकांक्षा सिडाम, श्रीमती रत्नमाला ढुमणे, ग्रामसेवक सीमा इंगळे उपस्थित होते.
मुख्यकार्यकारी अधिकारी मा. श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांची जि. प.कात्री शाळेला भेट मुख्यकार्यकारी अधिकारी मा. श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांची जि. प.कात्री शाळेला भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on April 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.