पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्याला लोडशेडिंग बंद करा, अशी घोषणाबाजी देऊन निर्देशन आंदोलन
कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी,भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने पडोली फाटा चौक चंद्रपूर(ग्रामीण) येथील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वीज टंचाई विरोधात मेणबत्ती पेटवून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्याला लोडशेडिंग बंद करा अशी घोषणाबाजी नारे देऊन विरोध दर्शविण्यात आला.
माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा लोक लेखा समिती प्रमुख विधिमंडळ व माननीय देवरावदादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा, मा. नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा अनिल डोंगरे यांचे नेतृत्वात झालेल्या या निदर्शने आंदोलनात विजय आग्रे तालुका महामंत्री भाजपा, सौ.दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा, महिला आघाडी रामू बल्की तालुका महामंत्री, विनोद खेवले तालुका सचिव, विनोद खडसे, आशिष वाढई,अशोक पटेल,विनोद करमरकर,रोहन चालेकर,विक्की रेगुंत्वार,मोनू ठाकुर,दीपक गायकवाड, विष्णू वर्भे,संतोष सोनकर,राहुल पेंदल,बबन श्रिसागर, जागेश्वर चांदेवार, इत्यादी यांच्या उपस्थितीत या आंदोलन वेळी अनिल डोंगरे यांनी मागील भाजपा सरकारच्या काळात शेतकरी छोटे-मोठे उद्योग व्यापारी घरगुती वीज ग्राहक यांना वीज टंचाई व लोडशेडिंगमुळे कसल्याही प्रकारचा त्रास व नुकसान भरपाई चा सामना करावा लागला नाही. परंतु या महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशातून अंधारात जात आहे.
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे या जिल्ह्यात मोठ मोठे वीज प्रकल्प आहे. कोळसा खाणी, सिमेंट कारखाने,पोलाद कारखाने इत्यादी मुळे पहिलेच चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान संपूर्ण भारतातून उच्चांक गाठत आहे. या तापमानामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आमची या आंदोलनाच्या रूपाने शासनाला विनंती आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला या वीज टंचाईचा (लोडशेडिंग) भार पडू देऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे ते यावेळी बोलले.या आंदोलनाला चंद्रपूर (ग्रामीण) तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांच्या ताफ्याला लोडशेडिंग बंद करा, अशी घोषणाबाजी देऊन निर्देशन आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 25, 2022
Rating:
