आबड भवनला भीषण आग, फर्निचर जळून लाखोंचे नुकसान

सह्याद्री | चौफेर न्यूज

वणी :  टागोर चौकात असलेल्या आबड भवन ला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आग लागल्याचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांनी भवन कडे धाव घेतली. दरम्यान भवन अगीच्या विळख्यात असतांना भवन लगत दुकान आगीत जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.

  
थोडक्यात असे,शहरातील टागोर चौकात असलेल्या  आबड भावनातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले, जवळपास दुपारचे ३ वाजले असतील. बघता बघता धूरातून भीषण आग दिसून आल्याने त्याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

अग्निशमन दलाला कळताच अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत असून,यात लगतचे फर्निचर शॉप जळून खाक झाले. लाखोंचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे,मात्र नेमकी आग कशाने लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.


आबड भवनला भीषण आग, फर्निचर जळून लाखोंचे नुकसान आबड भवनला भीषण आग, फर्निचर जळून लाखोंचे नुकसान Reviewed by सह्याद्री चौफेर on April 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.