सामाजिक राजकीय संघटन भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन देण्यासाठी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीत सहभागी व्हावे - उपाध्यक्ष अॅड संतोष भादीकर यांचे आवाहन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
      
यवतमाळ : शासन व प्रशासन व्यवस्था कोलमडली आहे. नको तो अपप्रचार करून सामाजिक ऐक्याला धोका निर्माण झाला आहे.

समाजातील नैतिक, निष्कलंक, चारित्र्यवान लोकांच्या ऐक्यातून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सच्चा जनसेवक, निस्वार्थी लोकप्रतिनिधीच्या निवडीसाठी यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र ट्रायबल आघाडी ची स्थापना करण्यात आली आहे.
       
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा दृष्टीकोनातून निर्णय झाला आहे. भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन देण्याची हमी, दिव्यांग, वृद्ध, निराधार, अल्प सख्यक महिलांचे संरक्षण,शेतकरी, कामगार, मध्यम व्यापारी, विद्यार्थी, महिला युवकांचे सबलीकरण व एकीकरण इत्यादी प्रकारच्या सामाजिक राजकीय संघटन करण्यासाठी निस्वार्थी, निष्कलंक, चारित्र्यवान जनसेवक, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधीच्या निवडीसाठी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी तरूण तडफदार कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अॅड संतोष भादीकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले.
सामाजिक राजकीय संघटन भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन देण्यासाठी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीत सहभागी व्हावे - उपाध्यक्ष अॅड संतोष भादीकर यांचे आवाहन सामाजिक राजकीय संघटन भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन देण्यासाठी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीत सहभागी व्हावे - उपाध्यक्ष अॅड संतोष भादीकर यांचे आवाहन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 14, 2022 Rating: 5
Powered by Blogger.