टॉप बातम्या

पार्श्वगायक प्रा अनिल जोजारे यांचा सत्कार

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : औरंगाबाद येथे व्हिडिओकॉन कंपनीत सेवेत कार्यरत असलेले पार्श्वगायक प्रा अनिल जोजारे यांनी सुवर्ण समाज रत्न श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या कार्यावर प्रभाकर जोजारे प्रस्तुत, देवा तुझा मी नरहरी सोनार, प्रथम तुला वंदितो, देवाच्या समोर तुज मागतो मी आता, ठोकून ऐरणीवरती, इत्यादी अशी अनेक भक्ती गीते लिहून सोनार समाजात महाराष्ट्रात आपले नाव लोकिक केल्याबद्दल श्री संत शिरोमणी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर, संत नरहरी महाराज सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर, दैवज्ञ एकता संघ पुणे व सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर व टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे बालाजी सुवर्णकार, नामदेव सुवर्णकार यांनी प्रा अनिल जोजारे व राजश्री जोजारे यांचा सन्मान केला.

यावेळी प्रा जोजारे यांनी ऋण व्यक्त करून यापुढे मी खूप काम समाजात करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बालाजी सुवर्णकार यांनी केले.
Previous Post Next Post