टॉप बातम्या

एस.पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : भीमजयंती म्हणजे सामाजिक विषमते विरुद्ध बंड पुकारून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाजरचना निर्माण करणाऱ्या महामानवाचा आज जन्मदिन. या अनुषंगाने येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पार पडली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक मा. श्री. तामगाडगे सर यांनी डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री बुजोने सर यांनी केले.
Previous Post Next Post